‘बोल्ड अॅँड एलीगंट’ला कलाकारांची भेट

By Admin | Updated: November 30, 2014 00:32 IST2014-11-30T00:32:56+5:302014-11-30T00:32:56+5:30

बाजीव रस्त्यावरील बोल्ड अँड एलीगंट मेन्स गार्मेंटतर्फे ‘खरेदी करा आणि जिंका’ या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

Artist's gift to 'Bold And Elegant' | ‘बोल्ड अॅँड एलीगंट’ला कलाकारांची भेट

‘बोल्ड अॅँड एलीगंट’ला कलाकारांची भेट

पुणो : बाजीव रस्त्यावरील बोल्ड अँड एलीगंट मेन्स गार्मेंटतर्फे  ‘खरेदी करा आणि जिंका’ या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. 
बोल्ड अँड एलीगंटतर्फे 5 ते 2क् नोव्हेंबर दरम्यान ‘खरेदी करा व जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  नशीबवान ग्राहकांना शोरूमच्या भव्य स्टुडिओ रँपवॉक करण्याची संधी मिळाली. या वेळी ‘हॅपी जर्नी’ या मराठी चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.  अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिद्धार्थ मेनन यांनी परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.  श्री आणि श्रीमती बोल्ड अँड इलेजंट पुरस्कार विजेत्यांना देण्यात आला. 
ग्राहकांशी संवाद साधताना अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘बोल्ड अँड एलीगंट मेन्स गार्मेटमधील विविध प्रकारचे ब्रॅंडेड कपडे आणि त्यांची किफायतशीर किंमत पाहून प्रभावित झालो. 
लगीनघाईमध्ये नूतन वर अगदी  घाईगडबडीत आले तरी त्यांना स्वत:च्या पसंदीचे डिझायनिंग केलेले ड्रेस येथे खात्रीने मिळू शकतात, हे येथील वैशिटय़ आहे.’’
या वेळी अतुल कुलकर्णी येथील एक ब्लेझर ट्राय करूनही पाहिले. 
प्रिया बापट म्हणाल्या,   ‘‘पुण्यातील मध्यवस्तीत खास पुरुषांकरिता इतके मोठे, सुंदर आणि अदबशीर कर्मचारी असलेले शोरूम पाहून छान वाटले. येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.’’
बोल्ड अँड एलीगंटचे संचालक नीलेश लद्दाद, वेंकटेश राठी, राहुल बिर्ला व निखिल जाजू आदींनी कलाकारांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Artist's gift to 'Bold And Elegant'