शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हयात खतांचा कृत्रिम तुटवडा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 14:47 IST

पीक चांगले यावे, यासाठी खतांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देचढ्या दराने होतेय विक्री : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी

पुणे : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सर्वत्र पेरण्या सुरू असून बहुतांश पेरण्या या उरकत आल्या आहेत. पिकांची वाढ चांगली व्हावी, यासाठी शेतकरी पिकांना खते देण्यासाठी खरेदी करत आहेत; मात्र या खतांचा कृत्रिम तुटवडा करून त्याची चढ्या दराने विक्री केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांकडे केली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पीक चांगले यावे, यासाठी खतांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यावर्षी खतांचा तुटवडा पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात खतांची उपलब्धता करून दिली होती; मात्र या खताची कृत्रिम टंचाई करून त्याची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यां ची लूट सुरू आहे.  याबाबत पुरंदर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार केली आहे़  पुरंदर तालुक्यातील बहुतांश खत विक्रेत्यांकडे खते उपलब्ध नाहीत, असे भासविले जात आहे़  याबाबत पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांकडे तक्रार केली असता ते देखील दखल घेत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़  या कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील काही अधिकाºयांकडे केल्यास ते संबंधित कृषी अधिकाऱ्याला आमची नावे सांगतात़  एकंदरीतच खतांचा कृत्रिम तुटवडा हा पुरंदर तालुक्यातील काही विक्रेते आणि तेथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचेही शेतकऱ्यांनी तक्रारीदरम्यान सांगितले़  .......जे कोणी विक्रेते शेतकऱ्यांची लूट करत असतील अथवा त्यांना चढ्या दराने खतांची विक्री करत असतील, तर याबाबत माहिती घेऊन तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे़ तसेच याबाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल़ त्यामुळे शेतकºयांनी चढ्या दराने विक्री करणाऱ्यांची तक्रार करावी़- अनिल देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे..........युरियाची बाजारातील किंमत ही २६५ रुपये असतानाही ३२० रुपयांना त्याची विक्री केली जात असून, शेतकºयांची लूट केली जात आहे़  याबाबत जिल्हा परिषद काय कार्यवाही करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे़  पुरंदर तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्येही असाच प्रकार सुरू आहे़४पेरणी केल्यावर शेतकऱ्यांना खतांची कमतरता पडू नये, यासाठी यावर्षी युरिया, डीएपी, एमओपी आणि एसएसपी खते जिल्हापरिषदेतर्फे उपलब्ध खरीपासाठी करून दिली जाण्याची घोषणा केली होती. जवळपास १ लाख ७० हजार ६७० टन खते शेतकºयांना दिली जाणार होती.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेती