शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तणावमुक्तीसाठी कला जोपासा : डॉ. जब्बार पटेल; राजस्व कला महोत्सवाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:42 IST

तणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे; त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल, असे मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकेंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्त कार्यालय पुणे च्या वतीने राजस्व कला महोत्सवभारतीय कला, नृत्य हे आपल्या संस्कृतीचे वेगळेपण : पटेल

पुणे : डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस व अन्य कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाला सतत ताणतणाव येत असतो. या तणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे; त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल, असे मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्त कार्यालय पुणे च्या वतीने आयोजित राजस्व कला महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आयकर विभाग आयुक्त प्रमुख विनोदानंद झा, शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे, चेअरमन मिलिंद गवई, कमिशनर राजीव कपूर, एन. श्रीधर, के . पी सिंग आदी उपस्थित होते. या महोत्सवात कलाकारांनी तेरा निरनिराळ्या कला सादर करून दाखवल्या. पटेल म्हणाले, कुठल्याही क्षेत्राचा कलेशी संबंध नसतो; पण भारतीय कला, नृत्य हे आपल्या संस्कृतीचे वेगळेपण आहे. त्यामुळे आपले मन प्रसन्न आणि शांत राहते. आयकर विभागातील आॅफिसर अशा कलेला आणि संस्कृतीला जोपासतात आणि अशा प्रकारच्या कला महोत्सवाचे आयोजन करतात ही कौतुकाची गोष्ट आहे. विनोदानंद झा म्हणाले, आयकर विभागातील आॅफिसर चेहº्यावरून फारच कडक स्वभावाचे असतात आणि त्यांच्यासमोर जायला पण भीती वाटते. पण असे असतानाही त्यांना अशा कला सादर करताना पाहून खूप आश्चर्य वाटत आहे. संगीत, कला, संस्कृती या मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. आयकर विभागातील प्रत्येक आॅफिसर, कमिशनर हे मनापासून काम करत असतात तेव्हा त्यांना अनेक अडथळे आणि तणाव याला सामोरे जावे लागते. संगीत, कला, आणि नृत्य या कलेमुळे ते जीवनातील थोडा वेळ रममाण होऊ शकतात.   

सर्व ठिकाणी कलेला खूपच महत्त्व  आहे. कुठल्याही कलेत यशाचा विचार न करता सर्वांसमोर उत्तम सादरीकरण कसे होईल, हे पहिले पाहिजे. जीवनात आनंद फक्त कलेमुळे येतो, नाही तर त्याशिवाय मानवी जीवन हे पशुसमान आहे. प्रत्येक व्यक्ती कलाकार नसते; पण एक संवेदनशील प्रेक्षक असतो. आता कलाकाराने कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे. - प्रभा अत्रे 

टॅग्स :Jabbar Patelजब्बार पटेल Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPuneपुणे