कला शाखेचा निकाल ५१.७०%

By Admin | Updated: June 24, 2016 02:16 IST2016-06-24T02:16:08+5:302016-06-24T02:16:08+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कला शाखेच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला

Art Branch Results 51.70% | कला शाखेचा निकाल ५१.७०%

कला शाखेचा निकाल ५१.७०%

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कला शाखेच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला असून, २०१३ पॅटर्नच्या परीक्षेचा निकाल ५१.७० टक्के लागला आहे. मात्र, तब्बल १ हजार ६९५ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आली. २१ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील २१ हजार ११६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यात प्रथम श्रेणीसह डिस्टिंगशन मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार २७४ असून, ४ हजार २७६ विद्यार्थी प्रथम श्रेणी आहेत. तसेच २ हजार ३७२ विद्यार्थ्यांना उच्च द्वितीय श्रेणी मिळाली असून, १ हजार ५३४ विद्यार्थ्यांना व्दितीय श्रेणी मिळाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाने काही परीक्षांच्या निकालाचे काम कंत्राटदाराकडे सोपविले आहे. त्यामुळे काही परीक्षांचे निकाल लागण्यास उशीर होत आहे. कला शाखेचा निकाल जाहीर करण्यासही विलंब झाला. विद्यापीठातील विविध विभागांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.मात्र, निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी (दि.२३)कला शाखेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, तब्बल १ हजार ६९५ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Art Branch Results 51.70%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.