शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जल्लोषात ‘श्रीं’चे घरोघरी आगमन; फुलांची आरास, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 20:18 IST

मोदक मिठाईच्या गोडव्याने बाप्पाच्या आगमानाचा आनंद द्विगुणित झाला

ठळक मुद्देअनेकांनी बाप्पाच्या आगमनाची क्षणचित्रे सोशल मीडियावर केली पोस्ट बाप्पाला घरी नेताना सहकुटुंब पारंपारिक वेशभूषेत आले दिसून

पुणे : ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात शुक्रवारी घरोघरी ’श्रीं’चे आगमन झाले. कोरोनामुळे पसरलेल्या नैराश्यमयी वातावरणात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने उत्साह आणि आनंदाचे रंग भरले. आकर्षक रंगावली. फुलांची आरास, लाईटिंगच्या माळा, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा घरोघरी विराजमान झाला. ‘मोदक मिठाईच्या गोडव्याने बाप्पाच्या आगमानाचा आनंद द्विगुणित झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी कुटुंबांमधला उत्साह कमी झालेला नव्हता. गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेश मूर्तींच्या स्टॉलवर भाविकांची गर्दी झाली होती. मध्यवर्ती पेठांसह, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता व उपनगरच्या भागात ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत बाप्पाला घरी नेताना सहकुटुंब पारंपारिकवेशभूषेत दिसून आली. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीत, कोणी रिक्षात तर कोणी टॅम्पोत बाप्पाला उत्साहाने घरी घेऊन जाताना दिसत होते. काहींनी पारंपरिक वेशभूषेत जयघोष करत बाप्पाला घरी नेले.

घराघरांमध्ये सकाळपासून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. महिला वर्ग नैवेद्यासाठी मोदक करण्याच्या तयारीत मग्न होता. सकाळी आठपासून ते चार वाजेपर्यंत शहरात ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जल्लोष सुरू होता. घरोघरी ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करून आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला. अनेकांनी बाप्पाच्या आगमनाची क्षणचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. बाप्पाच्या आगमानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करण्यात आले तर व्हॉट्सअॅपवर घरगुती बाप्पाची आणि सजावटीची छायाचित्रे अनेकांनी पोस्ट करत आनंद द्विगुणित केला. तर घरगुती गणपतीसोबतचा खास सेल्फीही तरुणाईने शेअर केला अन त्यावर लाईकचा वर्षावही झाला.

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सव