शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील कार्यकर्ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच आटोपला मेळावा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:36 IST

पक्षाच्या वर्धापनदिनासाठी म्हणून मोठी तयारी करून, प्रभागातील मतदारांना बरोबर घेऊन गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवकांपैकी काही जण मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मेळावा संपला.

पुणे - पक्षाच्या वर्धापनदिनासाठी म्हणून मोठी तयारी करून, प्रभागातील मतदारांना बरोबर घेऊन गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवकांपैकी काही जण मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मेळावा संपला. सकाळी पुण्यातून निघायला उशीर व नंतर वाहतूककोंडीमुळे मुंबईत पोहोचायला उशीर असे बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे झाले.त्यातच मेळाव्याच्या नियोजनामध्ये सकाळी लवकरच सर्व भाषणे घेण्यात आली. मेळावा सकाळी ११ वाजताच सुरू करण्यात आला. त्यामुळे तो लवकरच संपला. कार्यकर्ते रस्त्यावर असतानाच त्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे भाषण संपल्याचा निरोप मिळाला. पुण्यातून ५०० पेक्षा जास्त वाहने नेण्यात आली होती. नगरसेवकांना तशी तंबीच पक्षश्रेष्ठींनी दिली होती. आमदारांनाही तसेच सांगण्यात आले होते. चहा, नाष्टा यात बराच वेळ गेला. महिला नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील महिलांना बरोबर घेतले होते. त्यासाठी खास गाड्या करण्यात आल्या होत्या.भल्या सकाळीच निघण्याच्या सूचना असूनही सगळे आवरून निघायलाच अनेकांना बराच उशीर झाला. त्यातच वाहनांच्या संख्येमुळे मुंबई द्रुतगती मार्गावर गर्दी झाली. टोलनाक्यापासूनच वाहने संथ जात होती. काही जण मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले, मात्र प्रत्यक्ष स्थळापासून ३ किलोमीटर अंतरावरच वाहने थांबवली. तिथेच वाहनतळाची व्यवस्था केली होती. त्यामुळे चालत जातानाही विलंब झाला.पुण्याहून मोठ्या संख्येने बस येत असल्याचे समजताच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या गाड्यांना मेळावा संपला असे सांगत उलट दिशेने परतण्याची विनंती केली. पुढे जाल तर वाहतूककोंडीत सापडाल, त्यामुळे परत पुण्याकडेच जा, असे त्यांना सांगण्यात आले. मेळावा संपल्याची माहिती या पदाधिकाºयांनाही मिळाली.

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणे