शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालखी आणि फुलांच्या रथातून झाले मानाच्या गणपतींचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:45 IST

भव्य मिरवणुका काढत पुण्यातील मानाचे पाचही गणपती मंडळांमध्ये विराजमान झाले.

पुणे: गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाच्या जयघोषात चांदीची पालखी आणि आकर्षक फुलांच्या रथातून मानांच्या पाचही गणपतींचे आगमन झाले. ढोल पथकांच्या निनादात सकाळी आठ वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. नववारी साड्या नेसलेल्या महिला, फेटे, सलवार कुर्ता असा पारंपरिक वेशभूषा प्रदान करणारे पुरुष, लहान मुले मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशा पथकांमध्येही तरुणी-तरुणींचा उत्साह दिसून येत होता. मानाचा पहिला कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू झाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचा विजय असो, अशा जयघोषात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. पालखीबरोबर अब्दागिरी घेऊन जाणारे मावळे आणि छत्री घेऊन जाणारा सेवक होता. या मिरवणुकीत श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकांनी निरनिराळ्या तालावर ढोल ताशा निनादाचे सादरीकरण केले. 

मानाचा दुसरा तांबडी जाेगेश्वरी गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. सकाळी १०.३० वाजता शंख निनादाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी घातल्या होत्या. शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्ड मिरवणुकीत सहभाग झाले होते. दुपारी १ वाजता उत्सवमंडपात श्रींची प्राणप्रतिष्ठा इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बाल आणि धारिवाल समूहाच्या अध्यक्ष जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आली. 

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक रंगबेरंगी फुलांच्या रथातून काढण्यात आली. मिरवणुकीत नादब्रम्ह, गर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गुरुजी प्रतिष्ठान या पथकांसह यावर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी झाले. तीस कैदी बांधवांच्या पथकात २८ ढोलवादक आणि २ ताशा वादक होते. गणेशोत्सवाच्या २५ दिवस अगोदर या कैद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. इतिहासात प्रथम असे कैद्यांनी मानाच्या गणपतीसमोर ढोल ताशा वादन केले आहे. उद्योगपती विशाल व श्‍वेता चोरडिया यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ रथामधील गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली. मिरवणुकीत वाद्यवृंद, भद्राय आणि श्री रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक यांच्या वाद्यांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५  मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा या पथक सहभागी झाले होते. पारंपरिक लाकडी पालखीतून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली.  दुपारी १२ वाजून ३० वाजता "केसरी'चे विश्‍वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेश महोत्सव