केरळच्या आंब्याची आवक

By Admin | Updated: February 14, 2017 01:33 IST2017-02-14T01:32:42+5:302017-02-14T01:33:12+5:30

कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी असताना केरळमधून मात्र हापूससह लालबाग, बदाम, पायरी आंब्याची

Arrival of Kerala mango | केरळच्या आंब्याची आवक

केरळच्या आंब्याची आवक

पुणे : कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी असताना केरळमधून मात्र हापूससह लालबाग, बदाम, पायरी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात या आंब्याची सुमारे ११०० बॉक्सची आवक झाली.
पुण्यातील फळबाजारात मागील आठवड्यापासून केरळ येथून आंब्याची आवक वाढली आहे. दरवर्षी मुंबई बाजारातून पुण्यात हा आंबा आणला जात होता. यंदा थेट केरळ येथून येणाऱ्या आंब्याचे प्रमाण अधिक आहे. मार्केट यार्डात फळांचे व्यापारी रोहन उरसळ यांच्याकडे ११०० पेटींची आवक झाली आहे. केरळमधील सय्यद इब्राहीम सा या शेतकरी- विक्रेत्याकडून हा आंबा आला आहे. पुण्याबरोबर मुंबई, अहमदाबाद, इंदूर, उत्तर प्रदेश या भागातील बाजारपेठेंकडे आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. सध्या केरळचा आंब्याचा हंगाम एप्रिल महिन्यापर्यंत सुरू राहील. त्यानंतर रत्नागिरी येथील आंबा बाजारात येतो. त्यापाठोपाठ कर्नाटकाचा आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. यंदा केरळ येथून पंधरा दिवस आधीच आंबा बाजारात आला आहे. पावसाअभावी हंगाम लवकर सुरू झाला असून, यंदाच्या वर्षी चांगले उत्पादन झाले आहे. केरळच्या आंब्याला स्थानिक भागातून सध्या मागणी आहे, असे उरसळ यांनी सांगितले.

Web Title: Arrival of Kerala mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.