शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अटक टळली; १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करा, सर्वोच्च न्यायालयाचे डीएसकेंना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 15:11 IST

सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे. 

ठळक मुद्दे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात डीएसकेंनी सर्वोच्च न्यायालयात घेतली होती धावसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, मुदतीत सर्व रक्कम जमा करू : डीएसके

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. इतर राज्यात त्यांचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात डीएसकेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत सर्व रक्कम जमा करण्यात येईल. कोणाचाही एक रुपयादेखील आम्ही ठेवणार नाही. तसेच, कोणाचीही फसवणूक होणार नाही. न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरून मुदत वाढवून देवून आमच्यावर विश्वास दाखविला आहे. आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील व व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल, अशी प्रतिक्रिया डीएसके यांच्याकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत डीएसकेंनी गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे विविध बांधकाम प्रकल्पांची कामे ठप्प आहेत. अनेक सदनिकाधाकांना त्यांनी सदनिकांचा ताबा दिलेला नाही. काही प्रकल्पातील मजलेच तयार नाहीत. मात्र, ग्राहकांना बँकेचे हफ्ते देखील सुरु झाले आहेत. अशा ग्राहकांनी देखील त्यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय