प्रवाशांना लुटणारे २४ तासाच्या आत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST2021-06-27T04:08:52+5:302021-06-27T04:08:52+5:30

पुणे : पुणे स्टेशनच्या तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथे वाघोलीला जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना प्रवाशासमोर रिक्षा येऊन उभी राहिली. ...

Arrested within 24 hours for robbing passengers | प्रवाशांना लुटणारे २४ तासाच्या आत जेरबंद

प्रवाशांना लुटणारे २४ तासाच्या आत जेरबंद

पुणे : पुणे स्टेशनच्या तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथे वाघोलीला जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना प्रवाशासमोर रिक्षा येऊन उभी राहिली. रिक्षात अगोदरच एक प्रवासी बसला होता. वाघोलीला सोडतो असे सांगून त्यांना रिक्षात बसविले. रिक्षा मालधक्का चौकात आली असताना रिक्षात आणखी चार जण बसले. रिक्षा पुढे घेऊन जात प्रवाशाला खाली उतरवून त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून, चाकूने वार करीत त्याच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल बॅग काढून घेतली. प्रवाशाने पोलिसांकडे धाव घेतली आणि प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी पथके तयार केली. पोलिसांना माहिती मिळाली की पुणे रेल्वे स्टेशनच्या सम्राट हॉटेलच्या बाहेर तीन व्यक्ती रिक्षात बसल्या आहेत. त्यानुसार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आणखी तिघांची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेण्यासाठी अणखी एक टीम कामाला लागली. पुणे स्टेशनच्या बाहेर दोन आरोपी दिसले. पोलिसांना पाहून ते पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले. आरोपींकडून २ रिक्षा, ६ मोबाईल, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार करीत आहेत.

----------------------------------------------------

Web Title: Arrested within 24 hours for robbing passengers