एटीएमकार्डची अदलाबदल करून पैसे काढणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST2021-02-13T04:11:35+5:302021-02-13T04:11:35+5:30
अनुप शिवनाराणय पाझरे (वय ३३, रा. फुरसुंगी, मूळ रा. नागपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जयपालराम रामदेवजी काला (वय ...

एटीएमकार्डची अदलाबदल करून पैसे काढणारा अटकेत
अनुप शिवनाराणय पाझरे (वय ३३, रा. फुरसुंगी, मूळ रा. नागपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जयपालराम रामदेवजी काला (वय ४०, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी हे पैसे काढण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना मदतीचा बहाणा केला. त्यावेळी पाझरे याने त्याकडील बनावट एटीएम कार्ड काला यांना दिले व मूळ कार्ड स्वतः जवळ ठेवले. काला तेथून गेल्यानंतर पाझरे याने २० ते २१ जानेवारी दरम्यान त्या कार्डचा वापर करीत विविध एटीएममधून ७४ हजार ७६० रुपये काढून घेतले. आपल्या कार्डमधून कोणीतरी पैसे काढल्याचे लक्षात आल्यानंतर काला यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले होते.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी पाझरे याला अटक करीत त्याकडील १० कार्ड तसेच रोख १८ हजार रुपये जप्त केले. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पाझरे याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.