शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सासवड येथे गोळीबार करुन पलायन करणाऱ्या दोन जणांना अटक, एक जण फरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:21 IST

पेट्रोल पंपावर गाडी आडवी लावली या कारणांवरून चिडून जावून तीन तरूणांनी गोळीबार केल्याची घटना घटली होती.

 लोणी काळभोर : पेट्रोल पंपावर गाडी आडवी लावली या कारणांवरून चिडून जावून तीन तरूणांनी गोळीबार केल्याची घटना घटली होती. या गोळीबारानंतर तिथून पलायन करत दिवे घाट मार्गे हडपसर येथे आरोपी येत असताना त्यांतील दोघांना लोणी काळभोरपोलिसांनी ताब्यात घेतले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालत पलायन करण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना अटक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी निखील शिवराम लोहार ( वय २०, मुळ रा. हाळगरा, ता. निलंगा, जि.लातूर. सध्या रा. जकातनाका, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली ) व हनुमंत लक्ष्मण वाघमारे ( वय १८, मुळ रा. आंध्र प्रदेश, सध्या रा. ढोलवस्ती, ऊरूळी देवाची) या अटक करण्यात आली आहे. त्यांचा तिसरा साथीदार किशोर दणाणी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. सदर घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सासवड ( ता. पुरंदर ) येथे घडली. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सदर बाब तात्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांना कळवली. वरिष्ठानी दिलेल्या निदेर्शानुसार ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार निलेश राणे, विशाल रासकर, हेमंत कामथे, दिगंबर साळुंके यांनी सदर संशयित इसम व गाडीचा शोध घेण्यासाठी सासवड - पुणे राज्यमार्गावर हॉटेल विजय समोर नाकाबंदी करत चार चाकी गाडी क्रमांक (एमएच १२ एएक्स १७४४ आलेल्या आरोपींना थांबणयाचा इशारा दिला. त्यामध्ये तिन तरूण होते. पोलीस पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतू त्यांना न जुमानता चालकाने कार पोलीस हवालदार निलेश राणे यांचे अंगावर घातली. जिवाची पर्वा न करता आरोपींना बेड्या ठोकणाऱ्या लोणी काळभोर पोलीस पथकाला जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी २० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक