रिक्षातून दारू वाहतूक करणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:09 IST2021-04-17T04:09:40+5:302021-04-17T04:09:40+5:30

याप्रकरणी सपोनी राहुल साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा बाजूकडून पुणेकडे जाताना हरिचंद्री गावाच्या हद्दीत राजगड पोलिसांनी रिक्षा (एम एच ...

Arrested for transporting liquor in a rickshaw | रिक्षातून दारू वाहतूक करणारे अटकेत

रिक्षातून दारू वाहतूक करणारे अटकेत

याप्रकरणी सपोनी राहुल साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा बाजूकडून पुणेकडे जाताना हरिचंद्री गावाच्या हद्दीत राजगड पोलिसांनी रिक्षा (एम एच १२ जे एस ६३४५) मधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे किकवी समजले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे १ लाख ३८ हजारांचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे. हरिचंद्री गावाच्या हद्दीत राजगड पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली. याप्रकरणी सुनील हेमंत कामठे (वय ३५) व रिक्षाचालक विक्रम माणिक रजपूत (वय ३७, दोघेही रा. आदर्श इंदिरानगर, आरटीओ ऑफिसजवळ, पुणे) यांना अटक केली आहे. राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल साबळे, सहायक फौजदार अंकुश खोमणे, विजय नवले, हवालदार निवास जगदाळे, योगेश राजिवडे, नीलेश होवाळ, गणेश लडकत आदींनी ही कारवाई केली.

हरिचंद्री गावच्या हद्दीत राजगड पोलिसांनी रिक्षामधून अवैध दारूची वाहतूक करताना कारवाई केली.

Web Title: Arrested for transporting liquor in a rickshaw