मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

By Admin | Updated: February 10, 2016 03:20 IST2016-02-10T03:20:07+5:302016-02-10T03:20:07+5:30

शेतजमीन खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी हरिभाऊ रामचंद्र काटकर यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ४ हजारांची लाच घेताना पकडले.

Arrested for taking a bribe | मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

मोरगाव : शेतजमीन खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी हरिभाऊ रामचंद्र काटकर यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ४ हजारांची लाच घेताना पकडले. मोरगाव (ता . बारामती) येथे पोलीस मदत केंद्रासमोर हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि. ९) सायंकाळी सव्वाचार वाजता हा प्रकार घडला.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरगाव येथील मुख्य चौकात फिर्यादी एस. एल. खोमणे यांना मोरळवाडी (ता .बारामती) येथील खरेदी केलेल्या शेतजमिनीचा दस्त नोंद करून या मिळकतीचा सातबारा तयार करण्यासाठी मोरगावचे मंडलाधिकारी काटकर यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु यामध्ये तडजोड करून ४ हजार रुपये देण्यासाठी वारंवार त्यांनी तगादा लावल्याची तक्रार आहे.
आज यातील रक्कम रुपये ४ हजार घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून काटकर यास पकडले. मोरगाव मुख्य चौकात पोलीस मदत केंद्रासमोर श्री मयूरेश्वर स्वीट्स दुकानात ही कारवाई करण्यात आली. या पथकाने अनपेक्षित छापा टाकल्याने
बारामती महसूल खात्यात प्रचंड खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस अधीक्षक प्रकाश शिंदे, सहपोलीस निरीक्षक अरुण घोडके, जालिंदर तांदळे यांच्यासह पथकाने सापळा रचून कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Arrested for taking a bribe