हातात तलवार घेवून व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST2021-02-26T04:15:13+5:302021-02-26T04:15:13+5:30
पुणे : हातात तलवार घेवून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या रेकोर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने ...

हातात तलवार घेवून व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजविणारा अटकेत
पुणे : हातात तलवार घेवून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या रेकोर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने अटक केली आहे. गुन्हेगाराकडून मोटार सायकल, लोखंडी तलवार आणि मोबाइल जप्त केला आहे.
दादा ऊर्फ रतन बाळू धुमाळ (३०, रा. रामोशीआळी, हडपसर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळ याने हातात तलवार घेऊन मी या भागातील दादा आहे. अशा शेरेबाजीचे व्हिडीओ तयार करून व्हाॅट्सअॅप ग्रुपवर पाठविले. त्याने व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण परविण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याबाबत त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहे. धुमाळ हा मंत्री मार्केट, हडपसर गाव येथे थांबल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस नाईक मुंढे यांना कळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा लावून त्याला पकडले. या क्लिपबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः व्हाॅट्सअॅप ग्रुपवर टाकल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटर सायकल, लोखंडी तलवार, त्याचा मोबाइल जप्त केला आहे. अशा प्रकारे धमकीवजा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियाचा वापर करून समाजामध्ये वाईट विकृती निर्माण करून तरुणांच्या मनामध्ये चुकीचा संदेश पसरवून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.