खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:12+5:302021-01-08T04:29:12+5:30
भैरवनाथ बाबुराव साळुंखे (रा.धायरकर कॉलनी,कोरेगाव पार्क पुणे),योगेंद्र रघुनाथ खिस्ते (अल्फा प्रीमियर,विमाननगर),संदीप सेवकराम बसतानी (वय ३८ रा.फ्लॅट नं ५०२,लक्ष्मी इंक्लेव ...

खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक
भैरवनाथ बाबुराव साळुंखे (रा.धायरकर कॉलनी,कोरेगाव पार्क पुणे),योगेंद्र रघुनाथ खिस्ते (अल्फा प्रीमियर,विमाननगर),संदीप सेवकराम बसतानी (वय ३८ रा.फ्लॅट नं ५०२,लक्ष्मी इंक्लेव लोणकर वस्ती मुंढवा),सुदेश संभाजी राव (वय ३४, रा. सुदर्शननगर पिपळे गुरव)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपूर्व सुभाषचंद्र नागपाल (वय४९, ,रा.क्लेवर हिल्स,कोंढवा) यांची आव्हाळवाडी येथे ४ एकरजमीन असून त्यामध्ये फार्महाऊस आहे. त्याचा सात बारा हा त्यांचे भावाच्या नावावर होता. २८ डिसेंबर रोजी काही लोकांनी त्या जागावेर साफसफाई करीत होत त्यामुळे त्यांची अपूर्व यांनी चौकशी केली त्यावेळी ही जमीन अपूर्व नागपाल यांच्याकडून विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आपणच अपूर्व असल्याचे सांगितल्यावर मात्र यात फसवणुक झाल्याची त्यांना शंका आली. त्यांनी अपूर्व यांना ईसार पावती म्हणून 1 कोटी रुपये दिल्याचा चेक दाखविला व ६.५ कोटी रुपये खरेदीखतच्या दिवशी देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या जमिनीचा खोटा दस्तऐवज व खोटे मालक बनवून लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यामुळे अपूर्व यांनी लोणीकंस पोलिस स्टेशन ठाण्यात तक्रार दिली.
या गुन्ह्यात आठ ते दहा लोकांची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्यातील आरोपींना पकडले.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्ता जगताप, हवालदार अनिल काळे, पोलिस नाईक गुरू जाधव, अभिजित एकशिंगे,पोलिस शिपाई बाळासाहेब खडके, पोलिस हवालदार प्रमोद नवले यांनी केली.
--
०४ वाघोली खोटे दस्ताऐवजटोळी