मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक
By Admin | Updated: September 14, 2015 04:55 IST2015-09-14T04:55:26+5:302015-09-14T04:55:26+5:30
पुणे रेल्वे स्थानकातून बिस्कीटाचे आमिष दाखवून एका वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक
पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून बिस्कीटाचे आमिष दाखवून एका वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी या महिलेला न्यायालयात हजर केले असता १८ सप्टेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
आशा हनुमंत शेंडे (वय २८, रा. दहीवडी, सातारा) असे आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेला अटक करण्यात आली असली तरी मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. कविता बाळू पवार या महिलेने लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही रेल्वे स्थानक परिसरातच राहत होती. २७ आॅगस्टला एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मुलाला बिस्कीटाचे आमिष दाखवून पळवून नेले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक महिला मुलाला पळवून नेत असल्याचे दिसले. त्यानुसार लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या पथकाने आरोपीस अटक केली. त्यामुळे मुलाच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली.