बेकायदा रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यास अटक

By Admin | Updated: October 14, 2016 05:10 IST2016-10-14T05:10:45+5:302016-10-14T05:10:45+5:30

हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने बेकायदा रिव्हॉल्वर बाळगणाऱ्याला अटक केली असून त्याच्याकडून गावठी रिव्हॉल्वर जप्त

Arrested for illegal revolvers | बेकायदा रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यास अटक

बेकायदा रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यास अटक

हडपसर : हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने बेकायदा रिव्हॉल्वर बाळगणाऱ्याला अटक केली असून त्याच्याकडून गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे.
सूरज रमेश पंडित (वय २२, रा. डॉ. दादा गुजर शाळेजवळ, महंमदवाडी रस्ता, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर हडपसर व वानवडी पोलीस ठाण्यात खून, धमकावणे, जबरी चोरी, दंगा, मारामारी, मनुष्याच्या जीवितास धोका निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पंडितकडे बेकायदा शस्त्र असून तो माळवाडी येथील धर्मवीर चौकामध्ये उभा असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पंडितला जेरबंद करण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी रिव्हॉल्वर मिळून आले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Arrested for illegal revolvers