शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानक उडवून लावण्याची धमकी देणारा जेरबंद; गुगल व्हॉईस सर्चवरुन काढला पोलिसांचा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 22:23 IST

गुगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे :पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा हा प्रत्यक्षात निरक्षर असून त्याने गुगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय २२, रा. सध्या सी एस टी फिरस्ता, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

प्रभू सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष् उच्च पदस्थ राजकीय नेते, मोठे उदयोगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे व वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर १३ मे रोजी स्फोटक सदृश्य वस्तू मिळून आल्याने पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना राबवित आहेत. त्यामध्ये १ पोलीस निरीक्षक व ५० पोलीस अंमलदार हे दररोज बंदोबस्तासाठी स्थानकावर नेमले आहेत.

सूर्यवंशी हा निरक्षर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी चोरलेल्या चोरलेल्या मोबाईलचा वापर करुन हा कॉल केला होता. तो निरक्षर आहे. त्याने गुगल व्हाॅईस सर्च वरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन नंबर शोधला व त्यानंतर फोन करुन हम पूना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन मे उडाने वाले है अशी धमकी दिली. हा फोन रेल तिकीट शाम यानाने रजिस्टर होता. लोहमार्ग पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस अंमलदार धीरज भोसले, रुपेश पवार, संदीप काटे, दिलीप खोत यांनी त्याचा शोध घेऊन मुंबईतील डोंगरी भागातून त्याला पकडले.

या कॉलमध्ये कोणतीही दहशतवादी संघटना अथवा सामाजिक अराजकता माजवणारे घटक नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने हे कृत्य केले असून यापूर्वीही त्याने असे कृत्य केल्याचे सांगत आहे. - सदानंद वायसे पाटील, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी