वाहकाला मारहाण करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST2020-12-26T04:09:26+5:302020-12-26T04:09:26+5:30

वाहक सुनिल लक्ष्मण पेठकर (वय ४५, आंबेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रविण भाऊसाहेब रणदिवे (वय ५५, धनकवडी) यांना अटक ...

Arrested for beating the carrier | वाहकाला मारहाण करणाऱ्यास अटक

वाहकाला मारहाण करणाऱ्यास अटक

वाहक सुनिल लक्ष्मण पेठकर (वय ४५, आंबेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रविण भाऊसाहेब रणदिवे (वय ५५, धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पेठकर हे धनकवडी ते स्वारगेट या मार्गावरील बसमध्ये होते. बस धनकवडीकडे जात असताना पेठकर प्रवाशांना तिकीट देत मागील दरवाजाकडे आले. यावेळी मागील आसनावर बसलेले प्रवासी रणदिवे यांच्याकेड त्यांनी तिकीट मागितले. तिकीट काढले असल्याचे सांगत त्यांनी दाखविले. पण तिकीट जुने असल्याने रणदिवे यांना नवीन तिकीट काढण्यास सांगितले. याचा राग मनात धरून रणदिवे यांनी पेठकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकारानंतर पेठकर यांनी सहकारनगर पोसि ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून रणदिवे यांना अटक केली, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

------------

Web Title: Arrested for beating the carrier