तलवारीने वार करून हप्ता मागणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:12 IST2021-02-25T04:12:29+5:302021-02-25T04:12:29+5:30
श?????? गणपत आंबोले (वय ३३, रा. सदुंबरे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महाळुंगे (ता. खेड) येथील अल्ट्राटेक ...

तलवारीने वार करून हप्ता मागणाऱ्यास अटक
श?????? गणपत आंबोले (वय ३३, रा. सदुंबरे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महाळुंगे (ता. खेड) येथील अल्ट्राटेक सर्पेशन प्रा. लि. कंपनीमध्ये गाडी कामावर लावावी किंवा दरमहिना २५ हजार रुपये हप्ता द्यावा याकरीता शुक्रवारी रात्री १०:३०च्या सुमारास दोन मोटार सायकलवरून आलेल्या चौघांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यांना फिर्यादी लोकेश रवींद्र पाटील यांनी शिवीगाळ का करत आहे? असे विचारले असता हातातील तलवारीने लोकेश पाटील यांचेवर वार केला. तो वार फिर्यादी लोकेश पाटील यांनी हुकविल्याने सिक्युरिटी कॅबिनची काच फुटली. यार चौघांविरुद्ध महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलीस हवालदार ज्ञानेदव आटोळे, श्रीधन इचके यांनी ही कारवाई केली.