पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST2021-09-18T04:11:31+5:302021-09-18T04:11:31+5:30
अक्षय सुशील शेलार (रा. आमराई, बारामती) असे त्याचे नाव आहे. सहायक फौजदार प्रदीप काळे यांनी याबाबत फिर्याद दिली. दि. ...

पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्यास अटक
अक्षय सुशील शेलार (रा. आमराई, बारामती) असे त्याचे नाव आहे.
सहायक फौजदार प्रदीप काळे यांनी याबाबत फिर्याद दिली. दि. १४ रोजी काळे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी पिंपळी गावच्या हद्दीत संग्राम सुदाम जाधव याच्या मटका अड्ड्यावर कारवाई करत असताना तेथे अक्षय शेलार हा आला. त्याने तुम्ही कशी काय रेड केली, तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीच दाखल करतो, मी चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांची जिरवली आहे. तुम्ही सगळेच धंदे बंद केले तर आम्ही कशावर जगायचे असे म्हणत काळे यांना ढकलून दिले. त्यांची कॉलर पकडत हुज्जत घालत शर्टाची बटणे तोडत झोंबाझोंबी केली. या घटनेत फिर्यादी पडल्याने त्यांच्या गुडघ्याला मार लागला. दरम्यान, पोलिसांनी शेलार याला अटक केली आहे.
----------------------