लॉक तोडून दुचाकी लंपास केलेल्याला पाच वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST2021-03-28T04:09:55+5:302021-03-28T04:09:55+5:30

पुणे : पार्क केलेल्या दुचाकीचे लॉक तोडून ती लंपास केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला तब्बल पाच वर्षांनी अटक ...

Arrested after five years | लॉक तोडून दुचाकी लंपास केलेल्याला पाच वर्षांनी अटक

लॉक तोडून दुचाकी लंपास केलेल्याला पाच वर्षांनी अटक

पुणे : पार्क केलेल्या दुचाकीचे लॉक तोडून ती लंपास केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला तब्बल पाच वर्षांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सुरेश वाशिवाले (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महेशकुमार माळी (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. ८ जून २०१६ रोजी कोथरूड परिसरात ही घटना घडली.

माळी यांनी त्यांची दुचाकी कोथरूड परिसारात पौड रोड येथे पार्क करून ठेवली होती. चोरट्याने तिचे लॉक तोडून ती लंपास केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशिवाले याला न्यायालयात हजर केले असता, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्याने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का?, त्याने चोरी केलेल्या दुचाकीचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

-----------------

Web Title: Arrested after five years