माऊंट सेंट पॅट्रिकच्या प्राचार्यालाही अटक

By Admin | Updated: December 17, 2014 05:29 IST2014-12-17T05:29:24+5:302014-12-17T05:29:24+5:30

लोहगावमधील माऊंट सेंट पॅट्रिक अ‍ॅकॅडमीतील विद्यार्थिनींचा उपप्राचार्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसांना याबाबतची माहिती वेळेवर दिली नाही

The arrest of the St. Patrick of the Mount was also arrested | माऊंट सेंट पॅट्रिकच्या प्राचार्यालाही अटक

माऊंट सेंट पॅट्रिकच्या प्राचार्यालाही अटक

येरवडा : लोहगावमधील माऊंट सेंट पॅट्रिक अ‍ॅकॅडमीतील विद्यार्थिनींचा उपप्राचार्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसांना याबाबतची माहिती वेळेवर दिली नाही, ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला व खोटा पुरावा तयार केला म्हणून विमानतळ पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांर्तगत (पाक्सो अ‍ॅक्ट) या विद्यालयाच्या प्राचार्यालाही अटक केली आहे. या प्राचार्यांना ७ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या उपप्राचार्यालाही मागील महिन्यातच अटक करण्यात आली होती.
ब्रदर जॉर्ज पी. यू. ऊर्फ जॉर्ज पर्मा कॅटिल (वय ५३, रा. माऊंट सेंट पॅट्रिक अ‍ॅकॅडमी, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव आहे. या विद्यालयाचा उपप्राचार्य सुरेश जॉनपॉल आरोग्यदास अ‍ॅडकलस स्वामी (वय. ३०, सध्या रा. लोहगाव, मूळ रा. पुनलवासल, ता. त्रिवययार, जि. तंजावर, तमिळनाडू) याला अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी १८ नोव्हेंबरला अटक केली होती. त्याची नुकतीच कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे.
या प्रकरणाचा तपास करीत असताना प्राचार्य जॉर्ज यांनी पालकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून खोटे पत्र लिहून घेतले व हे पत्र उपप्राचार्य स्वामी याच्या जामिनासाठी न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस व न्यायालयाला देण्यामध्ये दिरंगाई व कसूर केली.
या सर्व कारणांमुळे प्राचार्य कॅटील यांच्यावर कलम १९५(अ) व पाक्सो अ‍ॅक्टच्या कलम २१ नुसार गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The arrest of the St. Patrick of the Mount was also arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.