‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक
By Admin | Updated: October 11, 2014 06:43 IST2014-10-11T06:43:52+5:302014-10-11T06:43:52+5:30
चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या हस्तांतरणाच्या कामासाठी एक हजार ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या ‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले.

‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक
पुणे : चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या हस्तांतरणाच्या कामासाठी एक हजार ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या ‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ही कारवाई केली. विवेक रमेश शेळके (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपतकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. तक्रारदार यांच्याकडे चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे हस्तांतरणाचे काम होते. या वाहनांच्या हस्तांतरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अर्ज दिले होते. या कामासाठी शेळके याने चौदाशे रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाचलुचपतकडे तक्रार दिल्यावर सापळा लावून, लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. (प्रतिनिधी)