पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले आहे. कोरेगाव भीमा दंगलीला १८ दिवस पूर्ण झाले आहेत. या दंगलीच्या मुख्य सूत्रधारांविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असूनही सरकारने त्यांना अटक केलेली नाही. ही बाब लोकशाही व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने घातक आहे. अटकेची मागणी घेऊन विविध ३५ संघटनांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत घटनेचा निषेध नोंदविला. दंगलीमध्ये झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी तसेच राज्यभरातील गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत. पोलिसांकडून सुरु असलेले कोंबींग आॅपरेशन थांबवावे, एल्गार परिषदेच्या संयोजकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, दंगलीतील जखमी व ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या अमित भोंगाडे या युवकाला दहा लाखांची मदत मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामध्ये प्राचार्य म. ना. कांबळे, डॉ. संजय दाभाडे, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, धनंजय सोनवणे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोरेगाव भीमा दंगलीच्या सूत्रधारांना अटक करा, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 14:34 IST
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा दंगलीच्या सूत्रधारांना अटक करा, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन
ठळक मुद्देविविध ३५ संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले निवेदन