दरोडेखोरांच्या म्होरक्यास अटक
By Admin | Updated: July 10, 2014 00:10 IST2014-07-09T23:26:22+5:302014-07-10T00:10:13+5:30
यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी घातलेल्या दरोडय़ांमधील म्होरक्याला अटक करण्यात आली.

दरोडेखोरांच्या म्होरक्यास अटक
लोणी काळभोर : यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी घातलेल्या दरोडय़ांमधील म्होरक्याला अटक करण्यात आली. त्याला पुणो ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या चार साथीदारांना याआधीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजीराव देवकर म्हणाले, अतुल नानासाहेब दुतारे (वय 27, रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन दरोडय़ांची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख शिवाजीराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस हवालदार विद्याधर निचीत, सचिन घाडगे, बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत वाघ व सुनील ढगारे यांचे विशेष पथक स्थापन केले होते.
या टोळीने दुस:या दिवशी 8 एप्रिल 2क्14 रोजी पडवी (ता. दौंड) गावाच्या हद्दीत सुपे-मोरगाव रस्त्यावर कोंबडय़ांच्या टेंपोला गाडी आडवी मारून व टेम्पो चालकाला मारहाण केली होती. त्याच्याकडून 19 हजार रुपये रोख व मोबाईल चोरून नेला होता. या दोन्ही गुन्ह्यांत अतुल दुतारे व त्याचे चार साथीदार पोलिसांना हवे होते. दुतारे वगळता इतर चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या पूर्वीच पकडले होते. (वार्ताहर)
4अतुल दुतारे व त्याच्या चार साथीदारांनी सात एप्रिल रोजी पुणो-सोलापूर महामार्गावर खडकी (ता. दौंड) गावाच्या हद्दीत फिर्यादी प्रसाद प्रल्हाद जाधव (वय 23, रा. लातूर) व त्याचा मित्र पवन रोकडे यांना लुटले होते. जाधव व रोकडे दुचाकीवरून जात असताना अचानक पुण्याकडून आलेल्या मोटारीमधील दरोडेखोरांनी दुचाकीसमोर मोटार आडवी लावली. त्या नंतर दोघांना खाली ओढून मोटारीत बसवले व त्यांच्या कडील रोख 2 हजार शंभर रुपये, सोन्याचे दागिने, मोटारसायकल व मोबाईल काढून घेऊन त्यांना निर्जन ठिकाणी सोडले.