आंबेगावच्या लाचखोर उपअधीक्षकाला अटक
By Admin | Updated: January 16, 2015 23:54 IST2015-01-16T23:54:56+5:302015-01-16T23:54:56+5:30
जमीन मोजणीनंतर नकाशा व हद्दी दाखविण्यासाठी लाच घेताना आंबेगाव तालुका भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

आंबेगावच्या लाचखोर उपअधीक्षकाला अटक
घोडेगाव : जमीन मोजणीनंतर नकाशा व हद्दी दाखविण्यासाठी लाच घेताना आंबेगाव तालुका भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
मुनीर इस्माईल आत्तार असे त्यांचे नाव असून, ३0 हजारांची लाच घेताना त्याला पकडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, शिंगवे पारगाव येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी झाली होती. मोजणीनंतर हद्दी दाखवून देणे व नकाशा देणे या कामासाठी आत्तार यांनी सदर शेतकऱ्याकडे अडीच लाख रुपये मागितले होते. तडजोडीनंतर ५0 हजार रुपयांत काम करून देण्याचे ठरले होते.
सदर शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार केली. ठरलेल्या रकमेपैकी ३0 हजार रुपये शुक्रवारी (दि. १६) देण्याचे ठरले होते. दुपारी तीनच्या सुमारास ही रक्कम आत्तार यांना देत असताना त्यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, सुनीता साळुंके यांनी केली. (वार्ताहर)