संशयावरून प्रेमिकेला मारहाण करणाऱ्या प्रियकराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:14 IST2021-09-10T04:14:05+5:302021-09-10T04:14:05+5:30
पुणे : माझ्याशिवाय इतर मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा संशय घेऊन एकाने आपल्या प्रेमिकेला कमरेच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले. ...

संशयावरून प्रेमिकेला मारहाण करणाऱ्या प्रियकराला अटक
पुणे : माझ्याशिवाय इतर मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा संशय घेऊन एकाने आपल्या प्रेमिकेला कमरेच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले. उत्तमनगर पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे.
सुशांत नारायण काबदुले (वय ३०, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षांच्या तरुणीने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध आहेत. आपल्याशिवाय फिर्यादीचे इतर मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा आरोपीला संशय होता. कुडजे येथील हॉटेल साहीलमध्ये दोघे मंगळवारी दुपारी साडेचार वाजता भेटले. त्यावेळी सुशांत याने फिर्यादीला तुझे माझ्याशिवाय इतर मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा संशय घेतला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा सुशांतने फिर्यादीला हाताने तोंडावर, डोक्यात मारहाण केली. कमरेचा बेल्ट काढून पाठीवर मारून जखमी केले. त्याच्या या मारहाणीमुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. उत्तमनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून सुशांत काबदुले याला अटक केली आहे.