रेशनिंग कार्डासाठी लाच स्वीकारणाऱ्या एजंटला अटक
By Admin | Updated: June 7, 2015 02:55 IST2015-06-07T02:55:35+5:302015-06-07T02:55:35+5:30
एका ज्येष्ठ नागरिकाला रेशनिंग कार्ड काढून देण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारणारा एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

रेशनिंग कार्डासाठी लाच स्वीकारणाऱ्या एजंटला अटक
पुणे : एका ज्येष्ठ नागरिकाला रेशनिंग कार्ड काढून देण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारणारा एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी या एजंटविरुद्ध कारवाई करून अटक केली.
अजय ऊर्फ पांडुरंग सोमा लोंढे (वय ३४, रा. पर्वती पायथा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी १७ एप्रिल रोजी रेशनिंग कार्ड मिळावे यासाठी अंबिल ओढा येथील रेशनिंग कार्यालयात अर्ज केला होता. त्या वेळी एजंट अजय लोंढे याने रेशनिंग कार्ड काढून देण्यासाठी ८०० रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.