शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

थकबाकीदारांचे धाबे दणाणले; ४ दिवसांत ६८ मालमत्ता जप्त, पिंपरी महापालिकेची कारवाई

By विश्वास मोरे | Updated: October 8, 2023 15:17 IST

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख ७ हजार मालमत्ता आहेत

पिंपरी: महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. ६८ जणांच्या मालमत्ता जप्त केल्या. त्यामुळे आता मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले आहेत. मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कराचा भरणा करावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने केले आहे.

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख ७ हजार मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. पहिल्या सहामाहीत ५८५ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना १ ऑक्टोबरपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू आहे. 

आत्तापर्यंत कर संकलन विभागाने ४१हजार ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल ६७१कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीसा देऊनही कर न भरणाऱ्या सुरूवातीला बिगर निवासी व मोकळी जप्त करण्यास सुरुवात केली आहे. 

जप्ती मोहीम सुरू  महापालिकेने ३ ऑक्टोबरपासून जप्ती माहिती सुरू करण्यात आली असून २ हजार १८४ मालमत्ता धारकांना जप्ती अधिपत्र दिली आहेत. यापैकी १ हजार ९४८ मालमत्ता जप्ती अंमलबजावणीसाठी पात्र आहेत. यामध्ये ६८ मालमत्तांची जप्ती करण्यात आली. जप्ती करताच ६२ जणांनी तत्काळ ८७ लाख ३७ हजार रुपये रोख अथवा धनादेश जमा केले. तर सहा मालमत्ता या सील करण्यात आल्या आहेत. 

जप्ती मोहिमेसाठी विविध उपक्रम राबविणार

१) यूट्यूबवर टार्गेट ऑडियन्स पाहून त्या त्या विभागामध्ये जाहिरात प्रसिध्द करणार २) रिक्षावरती जिंगल द्वारे प्रबोधन करणार असून रिक्षा वरती छोटे पोस्टर जे ठळक अक्षरामध्ये असतील की जप्तीची मोहिमेची माहिती देणार. ३) महापालिकेच्या हद्दीमधील महत्वाचे वितरित होणारे वर्तमानपत्रामध्ये अमूलच्या धर्तीवर अभियान राबविण्यात येणार. सलग तीन महिने  माहितीपर आणि व्यंगचित्रात्मक जाहिरात देण्यात येणार आहे. तसेच पाॅम्पलेटही वाटप करण्यात येणार आहेत. 

कर संकलन विभागाचे आता व्हाट्सअप चॅनेल

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या विविध सवलत योजना, माहिती यासह जनजागृती,  थकबाकीदारांची माहितीही या व्हाट्सअप चॅनेल वरून प्रसारित करण्यात येणार आहे. जास्तीत -जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. -  नीलेश देशमुख (सहाय्यक आयुक्त)

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाMONEYपैसाcommissionerआयुक्तSocialसामाजिक