शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:38 IST

शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे

पुणे : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक अयोध्येसाठी सज्ज झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी राज ठाकरेंसोबत अयोध्येला यावे असे आवाहन मनसैनिकांकडून करण्यात येत आहे, त्यातच उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे येऊ देणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांचे अयोध्येत स्वागत केले जाईल. असंही ते म्हणाले होते. परंतु मनसेने या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता अयोध्या दौऱ्याच्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 

आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातही मनसेची अयोध्येला जाण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे. पुणे शहरातून ५ हजारच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

बाबर म्हणाले, अयोध्येसाठी आम्ही पुणे शहरातून नावनोंदणी सुरु केली आहे. त्यासाठी ''चला अयोध्या राज साहेबांसोबत'' असा फॉर्म तयार करण्यात आला आहे. आज दिवसभरात ४५० ते ५०० फॉर्म भरले गेले आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य नागरिकही अयोध्येला येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आमचा पुणे शहरातून जवळपास ५ हजार नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा मानस आहे. 

नावनोंदणी अभियानात उत्तर भारतीयांचाही समावेश  नावनोंदणी सुरु असताना उत्तर भारतीय नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ब्रिजभूषण यांचा विरोध वेगळा आहे. आम्ही उत्तर भारतीय २५ वर्षांपासून इथे महाराष्ट्रात राहत आहोत. महाराष्ट्रात राहून आम्ही पुढे गेलोय. मग उत्तर प्रदेश मध्ये सुखी झालो. त्यांना त्याच्याबद्दल काही माहित नाही. ते तिकडं बोलतात त्याचा त्रास आम्हाला इथं होतोय. आम्ही सगळे राज साहेबांसोबत अयोध्येला जाणार आहे. जवळपास २ ते ३ हजारचा ग्रुप महाराष्ट्रातून अयोध्येला जाणार आहे. राज साहेब करतात ते योग्य आहे. ब्रिजभूषणला साहेब काय बोलतात हे कळत नाही, त्यांना मराठी कळत नाही. त्याला काही माहित नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात संघर्ष झाल्यास आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याPoliticsराजकारण