शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

जेजुरी परिसरातील पिंगोरी येथे भीषण आगीत सुमारे ३०० एकरांवरील वनसंपदा नष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:11 IST

पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे.

ठळक मुद्दे९ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्याला वनविभागाला यश  शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान  

जेजुरी (नीरा) : पिंगोरी येथील खाजगी वनजमिनीला लागलेल्या आगीत तीनशे एकरावरील वनजमिनीतील वनसंपदा जाळून नष्ट झाली. वनविभागाच्या सलग ९ तासांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि ही आग नियंत्रणात आली. त्यामुळे मोठी अनर्थ टळला. मात्र, तरीही या आगीत ३०० एकरामधील वनसंपदा नष्ट झाली आहे. जेजुरी कडेपठारच्या पायथ्याला पिंगोरीच्या हद्दीत रविवारी (दि.१४) अज्ञात इसमाने खासगी डोंगरास आग लावली. यावेळी वनविभागाचे अधिकारी सर्व्हेसाठी आले होते. त्यांना कडेपठारच्या बाजूला मोठा धूर दिसल्याने पोलीस पाटील राहुल शिंदे, अधिकारी व ग्रामस्थ त्याठीकाणी गेले असता येथील डोंगराला मोठी आग लागल्याचे दिसले. यावेळी कोणताही विलंब न करता प्रथम आग विझवण्यास सुरवात केली. मात्र, आगीचे स्वरुप भीषण असल्याने यंत्र व आणखी कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचारी अशा सर्वांच्या जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. या कामात त्यांना पिंगोरी येथील बाबा शिंदे, अमोल शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर यादव, तुषार शिंदे व जवळ राहणारे नागरिक यांनी मदत केली.

.......................

 पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्याच बरोबर शासकीय वनजमीन देखील मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्यावतीने यामध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले आहे. पण अशा प्रकारच्या आगीमुळे या जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय पातळीवरून वन वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असले तरी लोकांकडून डोंगरांना आग लावण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे...............   शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान          आगीमध्ये जेजुरी मधील शासकीय वनीकरण केलेल्या जमिनीस मोठा धोका निर्माण झाला होता. जेजुरीच्या बाजूने शासनाने नुकतेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. ही आग तिथे गेली असती तर लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले वनीकरण नष्ट झाले असते. मात्र, वनपाल वाय.जे.पाचरणे व वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, कर्मचारी बाळू चव्हाण, महादेव थोरवे यांनी मोठे प्रयत्न करत या वनीकरणात जाणारी आग थोपवून धरली. त्यामुळे मोठे नुकसान टळले.        वाय.जे.पाचरणे ( वनरक्षक,पुरंदर )

.........           शासनस्तरावर वन वाढवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, काही लोकांच्या चुकांमुळे त्याची खुप मोठी किंमत मोजावी लागते आहे. काही लोक बांधावरच गवत काढण्याऐवजी ते पेटवतात आणि त्यामधून असे वनवे लागतात. लोकांनीही आता सामाजिक भान ठेवायला हवे. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वनसंपदा वाढणार नाही. याची मोठी किंमत पुढे जावुन मोजावी लागेल. यापुढे असे वणवे लागण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल...............डोंगराला आग लावू नका असे याभागातील लोकांना वारंवार बजावले आहे. वन संपदा व तीचे महत्व काय आहे? याबाबत गावातील तरुण लोकांमध्ये जागृतही करीत आहे. मात्र तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यापुढे लोकांनी काळजी घ्यायला हवी. राहुल शिंदे (पोलीस पाटील, पिंगोरी ) 

टॅग्स :Jejuriजेजुरीforest departmentवनविभागfire brigade puneपुणे अग्निशामक दल