शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वॉरियर्सला लष्कराचा सलाम ; लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 20:17 IST

काेराेनाच्या विराेधात लढणाऱ्या काेराेना वाॅरिअर्सचा सन्मान लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून करण्यात आला.

पुणे : कोरोना विषाणूमुळे देशात गेल्या ३९ दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा विषाणू पसरू नये तसेच त्याला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स,  परिचारीका, पोलीस दिवस रात्र झटत आहेत. स्वत:च्या जिवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता त्यांनी दिलेल्या सेवेमुळे देशांत रूग्णांची संख्या कमी आहे. या कोरोना वॉरियर्संनी केलेल्या त्यागाचा, बलिदानाचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे रविवारी करण्यात आला. 

कोरोना या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्यावर मात करण्यासाठी सर्व देश एकत्र आला आहे. विषाणूविरोधातील या लढाईत कोरोना योध्यांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत मानवतेच्या भवितव्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. कोरोना वॉरियर्सच्या या कर्तव्याचे, त्यांचे धैर्य, नि:स्वार्थ त्यागाचे आणि समर्पणाचे कौतुक सर्व देश करत आहे. त्यांच्या या कार्यामुळे कोरोना विरोधात असलेली लढाई आपण जिंकू शकतो. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्याात आला होता.

डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल फोर्सेस, स्वच्छता कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि जीवनावश्यक पुरवठा सेवा कर्मचा-यांमुळे देशातील नागरिक येत्या काळात सुरक्षित राहू शकणार आहे. या कठीण परिस्थीतीत त्यांनी २४ तास झटून काम केले आहे. त्यांच्या चिकाटीमुळे आणि मेहनतीमुळेच भारतात कोरनोचा प्रसार नियंत्रित करण्यास यश आले आहे, असा विश्वास लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी व्यक्त केला. देशात लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सरकार प्रयत्नात असताना, दक्षिणी मुख्यालय सर्व कोरोना योद्धांनाना प्रेरित करण्यासाठी त्यांचे आभार मानत असल्याचेही मोहंती म्हणाले.

पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका कार्यलय या सोबतच शहरातील सर्व पोलीस चौक्या, दवाखाने या ठिकाणी जात तेथील कर्मचा-यांचा सत्कार लष्करी अधिका-यांनी केला. महापालीकेत सफाई कर्मचा-यांसोबत केक कापत या काळात शहराची स्वच्छता त्यांनी राखल्याने त्यांच्या कार्याचे कौतूक लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती यांनी केले.

काेराेना याेध्यांमुळे काेराेनाच्या प्रसाराचा वेग कमी कोरोना विरोधी लढ्यात कोरोना योध्यांनी मोठे धैर्य दाखवले आहे. त्यांच्या या कार्यामुळे भारतात कोरोना प्रसाराचा वेग कमी होऊ शकला आहे. या कठीण परिस्थीतीत त्यांनी केलेले कार्य  अतुलनीय आहे. आपल्या देशातील सर्व नागरिकांकडून हे योध्ये नक्कीच कौतुकाचे पात्रता आहे.आम्ही दक्षिणी मुख्यालयातील सर्व सैन्य अधिकारी आणि सदस्य, राष्ट्रासाठी नि:स्वार्थ योगदान दिल्याबद्दल शूरवीर कोरोना वॉरियर्स यांना सलाम करतो आहोत.- लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती, कमांडन्ट दक्षिण मुख्यालय 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे