शस्त्रास्त्र बाळगणाऱ्याचा जामीन फेटाळला

By Admin | Updated: January 6, 2015 00:08 IST2015-01-06T00:08:38+5:302015-01-06T00:08:38+5:30

बेकायदेशीररीत्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या अविनाश मधुकर कदम (वय ४०, रा. गणेश पेठ) याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एम. जी. धोटे यांनी फेटाळला.

Arms warrant has been rejected | शस्त्रास्त्र बाळगणाऱ्याचा जामीन फेटाळला

शस्त्रास्त्र बाळगणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या अविनाश मधुकर कदम (वय ४०, रा. गणेश पेठ) याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एम. जी. धोटे यांनी फेटाळला.
दहशतवादविरोधी पथकाने २२ नोव्हेंबर २०१४ रोजी कदम याला अटक केली होती. त्या वेळी त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे माल जप्त करण्यात आला होता. यापूर्वी बंटी ऊर्फ महेश प्रकाश पवार (वय २४, रा. वडगाव बुद्रुक) याचाही जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला आहे.
आरोपींने पिस्तूल व काडतुसे याबाबत माहिती सांगितलेली नाही. त्यांना जामिनावर सोडल्यास ते पोलिसांना साठ्यापर्यत पोहचू देणार नाहीत. तसेच आरोपींनी राजेश पपुल ऊर्फ चोर राजा (रा. हडपसर) यांचा ठावठिकाणा सांगितलेला नाही. त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडू नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Arms warrant has been rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.