सिगारेट मागितल्याच्या कारणावरून भांडणे : जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:50+5:302021-07-11T04:08:50+5:30

पुणे : सिगारेट पिण्यास मागितल्याच्या कारणावरून सुरू झालेले भांडण हे मारहाणीपर्यंत पोहोचले. लोखंडी कोयता डोक्यात मारून लाकडी हॉकी स्टीकने ...

Arguing over a cigarette: Attempt to kill | सिगारेट मागितल्याच्या कारणावरून भांडणे : जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

सिगारेट मागितल्याच्या कारणावरून भांडणे : जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : सिगारेट पिण्यास मागितल्याच्या कारणावरून सुरू झालेले भांडण हे मारहाणीपर्यंत पोहोचले. लोखंडी कोयता डोक्यात मारून लाकडी हॉकी स्टीकने मारहाण करून एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश चौधरी (वय २४ रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार धनकवडी येथील शंकर महाराज वसाहतीमधील पंचवटी पार्किंगमध्ये दि. ६ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा त्यांचे मित्र सचिन आणि हर्षल यांच्यासमवेत चारचाकीमध्ये बसला होता. आकाश याच्या ओळखीच्या व्यक्ती सिगारेट ओढत तिथे आल्या. सचिन यांनी त्यांच्याकडे सिगारेट पिण्यास मागितली. या कारणावरून एका आरोपीने सचिन याच्या गालावर दोन चापट्या मारल्या. त्याच्या शर्टाला पकडले म्हणून आकाश आणि सचिनने भांडणे सोडविली. दि. ६ जुलै रोजी आकाश फिरत फिरत याठिकाणी आलेला असताना काहीही न बोलता आरोपींनी त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता डोक्यात मारून हॉकी स्टीकने मारहाण केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मदने करीत आहेत.

Web Title: Arguing over a cigarette: Attempt to kill