परिसराचा कायापालट करणार
By Admin | Updated: February 15, 2017 02:21 IST2017-02-15T02:21:54+5:302017-02-15T02:21:54+5:30
कात्रज भागाप्रमाणे विकासाची गंगा संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात नेणार आहे, परिसराचा कायापालट

परिसराचा कायापालट करणार
कात्रज : कात्रज भागाप्रमाणे विकासाची गंगा संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात नेणार आहे, परिसराचा कायापालट करणार आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी सांतिले.
प्रभाग क्रमांक ४० चे मनसेचे उमेदवार वसंत मोरे, अमित बेलदरे, सारिका विकास फाटे, दीपाली अमोल काकडे यांनी प्रचारफेरी काढली होती. मोरे म्हणाले, ‘‘कात्रजचा केलेला विकास हे विरोधकदेखील नाकारू शकत नाहीत. आश्वासने देऊन विकास होत नसतो, कात्रज भागात केल्याप्रमाणे तो करून दाखवावा लागतो. नागरिकांना प्रत्येक सुविधेसाठी पैसे मोजावे लागले आहेत. हे या भागातील नागरिक विसरणार नाहीत. विकास करण्यासाठी विकासालाच मत देतील व मनसेचे चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून देतील.
या वेळी पदयात्रेमध्ये संजय मोरे, योगेश खैरे, जंयत गिरी, विकास नाना फाटे, अमोल काकडे, नितीन जगताप, बाळकृष्ण फाटे, अंकुश जाधव, शंकर मारणे, नंदू घाटे, जीतू ओतारी, प्रदीप बेलदरे, गणेश खुटवड, दत्तात्रय चव्हाण, नितीन रेणुसे, नीलिमा तारवडे, मनीषा सातपुते, प्रशांत फाटे, महेश खेडेकर, बाळासाहेब फाटे, प्रतीक कोंडेकर, किशोर दारवाडकर, मंगेश दहीवडकर, सुहास देशमुख, बंडू सूर्यवंशी, मुनीर तांबोळी, हाजीलाल तांबोळी, सदीप जांभळे, रामभाऊ सणस, मयूर वाघमारे यांच्यासह भागातील अनेक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.