शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:12 IST

बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते.

पुणे : बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून शहर शाखेच्या ‘बाहेरून उमेदवार नको’ या ठरावाचा नक्की विचार केला जाईल, असे सांगितले असल्याची माहिती मिळाली.काँग्रेसच्या शहर शाखेने याआधीच आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड व पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची नावे निवड समितीकडे पाठविण्याचा ठराव केला. निवड समितीने त्यावर शिक्कामोर्तब करून ती नावे प्रदेशकडेही पाठविली आहेत. तरीही पक्ष उमेदवार आयात करणार आहे, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे यातील काही इच्छुकांनी थेट दिल्लीत पक्षाचे राज्याचे प्रभारी व लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे हेही त्यांच्यासमवेत होते. ‘आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या; मात्र बाहेरचा उमेदवार नको असे,’ या इच्छुकांनी खर्गे यांना सांगितले. प्रदेश शाखेकडून तसा रीतसर ठराव येऊ द्या, असा सल्ला खर्गे यांनी या इच्छुकांना दिला. त्यामुळे त्यांनी प्रजासत्ताकदिनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्याकडेही त्यांनी बाहेरचा उमेदवार लादू नका, अशा मागणी केली. शहर शाखेने तसा ठराव करून पाठविला आहे. आता प्रदेशने तो काँग्रेस महासामितीला पाठवावा, अशी विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्षांना केली. यावर चव्हाण यांनी उमेदवारी करण्याबाबत तुम्ही खरेच गंभीर आहेत का, असा सवाल त्यांना केला असल्याचे समजते. चव्हाण यांच्या या सवालाने सगळेच इच्छुक गडबडले. महासमितीने फक्त तीनच इच्छुकांची नावे मागितली आहेत; त्यामुळे यातून कोणाला बाहेर पडायचे असेल तर आत्ताच पडावे, असेही चव्हाण यांनी त्यांना सुचवले असल्याचे समजते. या चर्चेनंतर चव्हाण यांनी सर्वांबरोबर वैयक्तित चर्चाही केली. त्यात प्रामुख्याने खर्च कसा करणार, हा प्रश्न विचारण्यात आला. मतदारसंघांची यापूर्वीची माहिती, पक्षाची तसेच वैयक्तिक प्रभावस्थळेही याबाबतही त्यांना विचारणा केली. त्यावरून आता प्रदेश समिती या पाच जणांपैकी तीन जणांची नावे महासमितीला पाठविणार आहे. कोणाची नावे वगळणार, याबाबत चव्हाण यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही; मात्र वैयक्तित चर्चेतून त्यांनी ते निश्चित केले असल्याची चर्चा आहे.निष्ठावंतही सक्रियकाँग्रेसच्या पुण्यातील इच्छुकांनी लोकसभेसाठी सर्वांत आधी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या उसळत्या वारूला पक्षाबाहेरून उमेदवार येणार, या चर्चेने खीळ बसली आहे. पक्षाबाहेरच्या पुण्यातीलच एका उमेदवाराने पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त करून त्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली असल्याची चर्चा पुण्यात जोर धरत आहे. त्यामुळे धास्तावलेले इच्छुक दिल्ली, मुंबईत जाऊन निष्ठावंतांच्या नावाचा जोर धरत आहेत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९