शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Mutha Canal : आमच्या जीवाची किंमत काहीच नाही का : नागरिकांचा आर्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:58 IST

पुणे शहरातील दांडेकर पूल भागात फुटलेला मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत.

पुणे : पुणे शहरातील दांडेकर पूल भागात फुटलेला मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत.गुरुवारी सकाळी दांडेकर पुलाजवळील मुठा नदीचा कालवा फुटला. संबंधीत कालवा फुटून काही मिनिटात पाण्याचा मोठा प्रवास दांडेकर पुलाजवळील झोपडपट्टी भागात शिरला आणि सारे होत्याचे नव्हते झाले.एकमेकांना हात देऊन नागरिक बाहेर निघाले.आत अडकलेल्या अनेकांना अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले.यात स्थानिक नागरिक सोबत असल्याने अरुंद गल्ल्या, बोळी आणि घरे अग्निशमन दलाला सापडली.

मात्र ही दुर्घटना रात्री घडली असती तर काय झाले असते असा सवाल स्थनिक नागरिक विचारत होते. झोपडपट्टीत राहणारे माणसेही माणसेच आहेत.त्यांनाही जीव आहेत.असा कालवा जवळ असताना पाटबंधारे विभाग काहीही करत नसेल तर मात्र आमचे जीव स्वस्त झालेत अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक नोंदवत आहेत.सुमारे 18 वर्षांपूर्वी इथे भिंत बांधण्यात आली होती.आज आलेल्या पाण्यामुळे भिंत निम्मी वाहत गेली. त्यामुळे कुठली भिंत आणि कसले घर असा प्रश्न इथले रहिवासी विचारत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरDamधरणmula muthaमुळा मुठा