करंदीत अवैध धंद्याला बसला चाप

By Admin | Updated: April 29, 2017 03:47 IST2017-04-29T03:47:08+5:302017-04-29T03:47:08+5:30

येथील धुमाळ कॉम्प्लेक्सजवळ सुरू असलेला दारूअड्डा महिलामुक्ती मोर्चाच्या महिलांनी उद्ध्वस्त केला. याठिकाणी अवैधरीत्या

The arbitrage on the illegal business | करंदीत अवैध धंद्याला बसला चाप

करंदीत अवैध धंद्याला बसला चाप

केंदूर : येथील धुमाळ कॉम्प्लेक्सजवळ सुरू असलेला दारूअड्डा महिलामुक्ती मोर्चाच्या महिलांनी उद्ध्वस्त केला. याठिकाणी अवैधरीत्या दारू व्यवसाय सुरू असल्याची माहिती महिलामुक्ती मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा प्रीती चव्हाण, सचिव राजश्री पवार व संबंधित महिलांना मिळाली होती. त्यानुसार या महिलांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती देऊन संबंधित दारू जप्त करण्यात आली.
दारूविक्रेता चंदू चिना पवार यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संतोष पवार यांनी दिली आहे. परिसरात करंदी, केंदूर, चौफुला या ठिकाणी अद्यापही अवैधरीत्या दारूची मोठी विक्री केली जाते. तेथेही महिलांच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार असल्याचे म्दिलीप परदेशी, गजरा पोटे यांनी सांगितले.

Web Title: The arbitrage on the illegal business