अपु:या बससेवेमुळे विद्याथ्र्याची गैरसोय
By Admin | Updated: July 9, 2014 23:32 IST2014-07-09T23:32:08+5:302014-07-09T23:32:08+5:30
निमसाखर व परिसरातील विद्याथ्र्याना शालेय शिक्षणासाठी बारामती, कळंब आदी ठिकाणी निमसाखर येथून एसटीबसने जावे लागते.

अपु:या बससेवेमुळे विद्याथ्र्याची गैरसोय
निरवांगी : निमसाखर व परिसरातील विद्याथ्र्याना शालेय शिक्षणासाठी बारामती, कळंब आदी ठिकाणी निमसाखर येथून एसटीबसने जावे लागते. परंतु, अपु:या बससेवेमुळे विद्याथ्र्याना बसमध्ये जागा पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्याथ्र्याची गैरसोय होत आहे. पंरतु, अशा वेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तरी विद्याथ्र्याच्या सोयीसाठी जादा बस सोडावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करीत आहेत.
निमसाखर व परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी बारामती व कळंब या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी सात वाजता एसटीबस स्थानकात येत असतात.
या ठिकाणी दोनच बस सेवा देत आहेत. परंतु, या दोन्ही एसटीबस बावडा, रेडणी, निरवांगी या ठिकाणांहून प्रवासी व विद्याथ्र्यानी खच्च भरून येत असतात. त्यामुळे निमसाखर व परिसरातील सर्व विद्याथ्र्याना बसमध्ये जागा मिळत नाही. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी एकाच वेळी गर्दी होत असते.
इंदापूर आगाराला याबाबत अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, त्याची अद्याप दखल घेतली गेली नाही. निमसाखर या ठिकाणी घोरपडवाडी, बागाडे, पळसमंडळ, दगडवाडी या परिसरातील विद्यार्थी बसमधून प्रवास करण्यासाठी येत असतात. प्रसंगी जागेअभावी विद्याथ्र्याना बसच्या दारात लोंबकळून प्रवास करावा लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना होण्याआधी या ठिकाणी मुक्कामी बससेवा सुरू करावी, अशी मागणी पालक आणि विद्याथ्र्यामधून होत आहे. (वार्ताहर)