शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
3
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
4
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
6
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
7
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
8
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
9
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
10
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकडी येथे कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:50 IST

फुरसुंगी व देवाची उरुळी येथील नागरिकांनी पुणे शहरातील कचरा आपल्या हद्दीत टाकण्यास विरोध करत, येथील कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे...

ठळक मुद्देशहरातील तब्बल ३५० मे.टन कच-यावर होणार प्रक्रियाडिसेंबर २०१९ अखेर पर्यंत देवाची उरुळी येथील कचरा डोपोवर ओपन डपिंग शंभर टक्के बंद करण्याचे आदेशशहरामध्ये सध्या दररोज सुमारे २१०० मे.टन कचरा निर्माणशहराची पुढील दहा वर्षांतील वाढ लक्षात सुमारे १५५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन

पुणे: हडपसर येथील रामटेकडी येथे सुमारे सहा एकर जागेत बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला सोमावरी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये शहरातील तब्बल ३५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येणार असून, येत्या दीड वर्षांत प्रकल्प सुरु होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.     फुरसुंगी व देवाची उरुळी येथील नागरिकांनी पुणे शहरातील कचरा आपल्या हद्दीत टाकण्यास विरोध करत, येथील कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी हरित लवादामध्ये दावा देखील दाखल केले. या प्रकरणामध्ये लवादाने महापालिकेले डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत देवाची उरुळी येथील कचरा डोपोवर ओपन डपिंग शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिले. या संदर्भांत महापालिकेने देखील प्रतिज्ञा पत्रकाद्वारे ओपन डपिंग बंद करण्याचे लवादाला लेखी दिले आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी खास कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार नव्याने प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रामटेकडी येथील ३५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.    शहरामध्ये सध्या दररोज सुमारे २१०० मे.टन कचरा निर्माण होत असून, यापैकी केवळ १४७३ मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येते. याशिवाय प्रक्रिया करण्यात येणा-या कच-यापैकी दररोज किमान दहा टक्के रिजेक्ट झालेला कचरा ओपन डपिंग केला जातो. यामुळे सध्या दररोज किमान ७०० ते ७५० मे.टन कच-यावर कोणतीही प्रक्रिया न करता ओपन डपिंग केले जाते. त्यामुळे येत्या डिसेंबर अखेर पर्यंत किमान ८०० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा कृती आराखडा तयार करताना शहराची पुढील दहा वर्षांतील वाढ लक्षात सुमारे १५५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शहराच्या विविध भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यानुसार प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत.---------------- पुढील दीड-दोन वर्षांत शहरामध्ये प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पप्रकल्प            क्षमता (मे.टन)बायोएनर्जी, रामटेकडी        ७५०आदर्श कनस्ट्रकशन, रामटेकडी    २५संस्कृती मॅनेजमेंट, वडगावशेरी    २५सुखसागर नगर, कात्रज        ५०रामनगरी, आंबेगाव        १००हरणावळ, लोहगाव        १००दिशा, रामटेकडी        २००उरुळी, फुरसुंगी कचरा डेपा    २००एकून                १५५०         

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका