शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

आॅटो रिक्षांना सीएनजी किटसाठी अखेर अनुदान देण्यास मान्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 20:26 IST

शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी सात वर्षांपासून पुणे मनपाअंतर्गत सीएनजी किटसाठी अनुदान देण्यात येत आहे.

ठळक मुद्देमागील वर्षीपासून सीएनजी किट अनुदानासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सीएनजी किट बसविलेल्या जुन्या रिक्षांची संख्या ८३०

पुणे : शहरातील हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपये डीबीटी पध्दतीने देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.  शहरातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने सीएनजी किट बसविलेल्या आॅटो रिक्षांना साहाय्य अनुदान देण्यात येते. हरित इंधनाचा वापर वाढवा व शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी सात वर्षांपासून पुणे मनपाअंतर्गत सीएनजी किटसाठी सहाय्य अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या वर्षीच्या अंदाजपत्रकात सीएनजी किटसाठी एक कोटी रुपये इतकी तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. सीएनजी किटकरिता प्रत्येक रिक्षामालकाच्या नावे बारा हजार रुपये साहाय्य अनुदान देण्याबाबत मुख्य सभेने २३ आॅगस्ट २०११ अन्वये धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी ८३३ रिक्षांना या अनुदानाचा लाभ होणार आहे.     यासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच अनुदान वाटपाची कागदपत्रे एकत्रित ठेवणे, त्यामध्ये रिक्षांचे आर. सी. पुस्तकाची झेरॉक्स, प्रस्तावांची तपासणी, आरटीओकडे असलेल्या माहितीबरोबर जुळवून पडताळणी करणे, प्रस्तावांच्या रकमेचे बिल मनपाच्या आॅडिटकडे सादर करणे व रिक्षा परमिट धारकास डीबीटी पध्दतीने अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करणे इत्यादी सर्व बाबी अनुदानाच्या प्रक्रियेसाठी जुन्या रिक्षांपासून होणारे प्रदूषण कमी करणेसाठी त्यांना सीएनजी किट वापरण्यास प्रोत्साहन देणे या हेतूने पुणे मनपा अंतर्गत नवीन परमिट देण्यास सुरुवात केली असल्याने नवीन रिक्षांची संह्यया वाढली आहे व या सर्व रिक्षांमध्ये सीएनजी किट  आहे. तसेच सर्व नवीन रिक्षांना आरटीओ रजिस्ट्रेशनसाठी सीएनजी असे बंधनकारक झाले आहे.  मागील वर्षी सन २०१७-१८ मध्ये आॅनलाईन पध्दतीने अनुदानाचे अर्ज मागविण्यात आले होते व यामध्ये ४६०० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी उपलब्ध तरतूद रुपये २५ लाखांमध्ये २०८ रिक्षांना डीबीटी पध्दतीने अनुदान देण्यात आले. मागील वर्षाचे ४३९२ अर्ज पुणे मनपाकडे उपलब्ध आहेत. या सर्व अजार्चे विश्लेषण केले असता रिक्षा घेतल्यानंतर बाहेरून सीएनजी किट बसविलेल्या जुन्या रिक्षांची संख्या ८३० आहे. 

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका