शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयच्या ‘ त्या ’विद्यार्थ्यांची न्यायालयासमोर माफी: कारवाई मागे घेण्याचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:15 IST

संस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि अभ्यासक्रमातील त्रुटींविषयी एका प्राध्यापकाशी श्रीनिवास आणि मनोजकुमार या दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले होते.

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया संस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि अभ्यासक्रमातील त्रुटींविषयी एका प्राध्यापकाशी श्रीनिवास आणि मनोजकुमार या दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करण्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. त्यामुळे एफटीआयआय संस्थेने या दोन विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संग्रहालय (एफटीआयआय) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. श्रीनिवास राव थमराला या विद्यार्थ्यांलाच माफी मागावी लागली. या माफीनाम्यानंतर त्याच्यावरील कारवाई मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने एफटीआयआय प्रशासनाला दिला. संस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि अभ्यासक्रमातील त्रुटींविषयी एका प्राध्यापकाशी श्रीनिवास आणि मनोजकुमार या दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले होते. त्यामुळे संस्थेने या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केले. या कारवाईनंतर श्रीनिवासला १५ फेब्रुवारीपर्यंत वसतिगृह सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. मात्र, त्याने वसतिगृह न सोडल्याने १५ फेब्रुवारीच्या रात्री त्याला वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर श्रीनिवाससह अन्य विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करत संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. अखेर काही दिवसांनी संस्थेने त्याला पुन्हा दाखल करून घेतले. दरम्यान श्रीनिवासने मुंबई उच्च न्यायालयात संस्थेविरोधात याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि एम. एस. कर्णिक यांनी निकाल देताना माफी मागून वाद संपवण्यास सांगितले. तसेच माफी मागितल्याचे प्रतिज्ञापत्रही लिहून देण्यास सांगितले. त्यानुसार श्रीनिवासने माफीनामा लिहून दिल्यावर न्यायालयाने एफटीआयआय प्रशासनाला संबंधित विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले. तसेच त्याचा चुकलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे मार्गदर्शन करण्याबाबत स्पष्ट करतानाच श्रीनिवासलाही शिस्त पाळण्याची सूचना केली.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयCourtन्यायालयStudentविद्यार्थी