लोकसहभागातून केलेले जलसंधारणाचे काम कौतुस्कापद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:56+5:302021-02-05T05:03:56+5:30

सासवड : गावाच्या एकीचे बळ काय असते हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. लोकसहभागातून जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे केलेले काम ...

Appreciation of water conservation work done through public participation | लोकसहभागातून केलेले जलसंधारणाचे काम कौतुस्कापद

लोकसहभागातून केलेले जलसंधारणाचे काम कौतुस्कापद

सासवड : गावाच्या एकीचे बळ काय असते हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. लोकसहभागातून जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे केलेले काम अत्यंत कौतुस्कापद आहे, अशा शब्दात ग्रामस्थांचे कौतूक करतानाच आपण केलेल्या कामात सातत्य ठेवावे. मायक्रो प्लॅनिंग करून यापुढील कामांचे नियोजन करावे. तुम्ही एक पाऊल पुढे आल्यास शासन दोन पावले पुढे येण्यास तयार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथील गावाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देवून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामांची पाहणी केली. लोकसहभागातून केलेली कामे पाहून डॉ. देशमुख यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गावात पाणीसाठा वाढल्याने गावचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी मोठा उपयोग होईल. त्याचबरोबर पाणी पातळी वाढली म्हणून पाण्याचा गैरवापर किंवा अतिवापर न करता काटकसरीने वापर करा. जी मदत लागेल ती सर्व मदत देण्यासाठी शासन तयार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, विभागीय अधिकारी आबासाहेब लाड, तालुका समन्वयक मयूर साळुंखे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, छोटे पाटबंधारे विभागाचे अभियंता ए. एस. दिलपाक, सरपंच संतोष कुंभारकर, माजी चेअरमन मानसिंग झेंडे, नामदेव कुंभारकर, जलमित्र रामदास भोसले, भालेकर, अमोल नेटवे आदी उपस्थित होते. फाउंडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले कि, एखाद्या गावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली की, गावातील नागरिक अगदी हुरळून जातात आणि कामे मागे पडतात. त्यामुळे प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता जमिनीवर राहून कामात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पुढील कामात जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून जल व्यवस्थापन, माती व्यवस्थापन, गवताची लागवड, पाण्याचा योग्य वापर या कामांना प्राधान्य द्या. सरपंच संतोष कुंभारकर यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन कुंभारकर यांनी आभार मानले.

फोटो ओळ ; उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देवून जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, रूपाली सरनोबत तसेच उपस्थित अधिकारी आणि गावचे ग्रामस्थ.

संलग्‍नके क्षेत्र

फाउंडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले कि, एखाद्या गावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली कि, गावातील नागरिक अगदी हुरळून जातात आणि कामे मागे पडतात. त्यामुळे प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता जमिनीवर राहून कामात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील कामात जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून जलव्यवस्थापन, माती व्यवस्थापन, गवताची लागवड, पाण्याचा योग्य वापर या कामांना प्राधान्य द्या असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले आहे. सरपंच संतोष कुंभारकर यांनी प्रास्ताविक करताना गावाने केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच पुढील काळात करण्यात येणाऱ्या कामासाठी शासकीय निधी देण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन कुंभारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फोटो : उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देवून जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. या वेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, रूपाली सरनोबत तसेच अधिकारी आणि गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Appreciation of water conservation work done through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.