शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विधी विभागाच्या पूर्व मान्यतेशिवायच ‘सिनिअर वकिलां’ च्या नियुक्त्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:33 IST

महापालिकेच्यावतीने अथवा महापालिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायालयांमधील दावे, अपिल, अर्ज आदींबाबत खटले चालविले जातात.

ठळक मुद्देपालिकेतील प्रकार : वकिलांचे शूल्क अदा करण्यात येऊ लागल्या अडचणी

पुणे : महापालिकेतील विविध विभागांच्या खातेप्रमुखांनी त्यांच्या खात्यांचे खटले लढण्यासाठी परस्पर ज्येष्ठ वकिलांच्या नेमणूका केल्या असून या वकिलांचे शुल्क अदा करण्यामध्ये आता अडचणी येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे या नेमणुका करताना पालिकेच्या विधी विभागाची परवानगीच घेण्यात आलेली नाही. परस्पर झालेल्या या नेमणुकांपासून अनभिज्ञ असलेल्या विधी विभागाने सर्व खाते प्रमुखांना वकिलांच्या परस्पर नेमणुका करु नयेत असे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्यावतीने अथवा महापालिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायालयांमधील दावे, अपिल, अर्ज आदींबाबत खटले चालविले जातात. त्याकरिता पालिकेतर्फेस्थानिक पातळीसह मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासह अन्य न्यायालयांमध्ये वकिलांचे पॅनल नेमण्यात आलेले आहे. या पॅनलमार्फत ही प्रकरणे चालविली जातात. तर काही प्रकरणांमध्ये ज्येष्ठ वकिलांची (सिनीअर लॉयर) नेमणूक केली जाते. त्यांचे शुल्क अदा पूर्व मान्यता घेऊन अदा केली जातात. मात्र, पालिकेच्या विविध खात्यांमार्फत ज्येष्ठ वकिलांची परस्पर नेमणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा नेमणूका करु नयेत याकरिता विधी विभागाने सर्व खाते प्रमुखांना पत्र पाठविले आहे. अशा नेमणूक झालेल्या वकिलांचे शुल्क देण्याबाबतची प्रकरणे मान्यता देण्यासाठी विधी विभागाकडे आल्यानंतर हे प्रकार उघड होऊ लागले आहेत. पूर्व मान्यता न घेताच नेमण्यात आलेल्या वकिलांचे शूल्क अदा करण्यास मान्यता देण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वास्तविक कोणत्याही ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करावयाची असल्यास त्यांच्या नेमणुकीस आणि अदा करण्यात येणाºया शुल्काबाबत पूर्व मान्यता घेणे आवश्यक असल्याचे विधी विभागाने पत्रामध्ये म्हटले आहे. काही प्रकरणांमध्ये खात्याने विधी खात्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता परस्पर पॅनलवरील वकिलांना ज्येष्ठ वकिलांना नेमण्याच्या सुचना केल्याचेही दिसत असल्याचेही म्हटले आहे. एखाद्या खात्याला त्यांच्याकडील न्यायालयीन प्रकरणांमध्ये ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करावयाची असल्यास त्यांच्या नेमणुकीची कारणे आणि आवश्यकता यांच्या माहितीसह लेखी पूर्व कल्पना विधी खात्यास देणे आवश्यक आहे. यासोबतच विधी खात्याच्या शिफारशीसह ही प्रकरणे अतिरीक्त आयुक्त (जनरल) यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तातडीच्या स्थितीमध्ये ज्येष्ठ वकिल नेमण्यात आल्यास खटल्याच्या पुढील तारखेपर्यंत मान्यता घेणे बंधनकारक राहील. या व्यतिरीक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्येष्ठ वकिलांच्या नेमणुकीबाबत पूर्व मान्यता घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत. अन्यथा त्यांचे शूल्क अदा करण्यासाठी मान्यता दिली जाणार नाही असेही पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाadvocateवकिल