शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या जागांवरही भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ

By राजू इनामदार | Updated: June 8, 2023 17:30 IST

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

पुणे: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत, मात्र त्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. मात्र यात शिवसेनेच्या ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदं गट) जागांचाही समावेश असल्याने मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. या प्रमुखांवर त्यांना दिलेल्या मतदारसंघाची निवडणूक विषयक सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. मतदारांबरोबर नियमीत संपर्क, पक्षाची धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्यांची नाव, पत्त्यासहित यादी, पदाधिकाऱ्यांच्या नियमीत बैठका, त्यांच्या कामाचा आढावा अशी कामांची जंत्रीच या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यातून त्यात्या मतदारसंघात पक्षाचे संघटन व त्या माध्यमातून राजकीय शक्ती वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मात्र यात त्यांच्याबरोबर युती असलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटाकडे असणाऱ्या मतदारसंघांचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, बारामती, शिरूर, पुणे असे ४ लोकसभा मतदारसंघ येतात. त्यातील मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात आहेत. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव हेही शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी या जागा साहजिकच शिंदे गट मागणार आहे. तिथे भाजपने मावळसाठी प्रशांत ठाकूर तर शिरूरसाठी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे.

पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुरूवातीपासूनच शिंदे गटाची साथ दिली आहे. तिथे भाजपने बाबाराजे जाधवराव यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. शिंदे गटाने जिल्ह्यातील आणखी काही मतदारसंघांवर दावा केला आहे, मात्र तिथेही भाजपने नियुक्त्या दिल्याच आहेत. शिंदं समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ झाले आहेत. विशेषत: माव‌ळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील बारणे, आढळराव समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाजपचे काम आमच्या मतदारसंघात वाढले तर मग आम्ही कोणते काम करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

''अशा नियुक्त्याने काही फरक पडेल असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे यापुढच्या सर्व निवडणूका आम्ही युती म्हणून लढणार असे जाहीर केले आहे. युती असली तरी आम्हा दोघांनाही आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहेच. जागा वाटप झाल्यावर तिथे आमची एकमेकांना मदतच होणार आहे. किरण साळी- राज्य सचिव, युवा सेना, शिंदे गट'' 

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाPoliticsराजकारण