हवेली तहसीलदारपदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST2021-05-12T04:11:22+5:302021-05-12T04:11:22+5:30

पुणे : सध्या पुणे शहर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती कोलते यांची हवेली तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या ...

Appointment of Trupti Kolte as Haveli Tehsildar | हवेली तहसीलदारपदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती

हवेली तहसीलदारपदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती

पुणे : सध्या पुणे शहर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती कोलते यांची हवेली तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोलते यांची हवेली तहसीलदारपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती, अखेर सोमवारी उशिरा शासनाने त्यांच्या बदलीचा आदेश काढले.

कोलते यांनी मागील वर्षी पुणे शहरामध्ये आलेल्या पुराच्या वेळी उल्लेखनीय कामगिरी केली होती. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले होते. यापूर्वी त्यांनी पुणे शहर, मावळ आणि सोलापूर येथे तहसीलदार या पदावर काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे तृप्ती कोलते यांनी सांगितले. त्यांनी तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हवेली तहसीलदार बदलीची चर्चा होती. त्यांच्या बदलीने यावर पडदा पडला आहे.

Web Title: Appointment of Trupti Kolte as Haveli Tehsildar