श्रुतिका कांबळेची पंच म्हणून नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST2021-07-21T04:08:55+5:302021-07-21T04:08:55+5:30
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे नुकतीच सायोकान मार्शल आर्ट नॅशनल रेफ्री (पंच) डिप्लोमा कोर्स सेमिनार पार पडला. या सेमिनारमध्ये ...

श्रुतिका कांबळेची पंच म्हणून नेमणूक
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे नुकतीच सायोकान मार्शल आर्ट नॅशनल रेफ्री (पंच) डिप्लोमा कोर्स सेमिनार पार पडला. या सेमिनारमध्ये महाराष्ट्रामधून श्रुतिका समीर कांबळे (काटेवाडी-बारामती), विशाल ठोंबरे (खताळपट्टा-बारामती), हर्षल खर्चे (बुलडाणा) यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कांबळे हिची निवड झाली आहे. सेमिनारचे आयोजन सायोकान फेडरेशन आॅफ इंडिया यांनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जम्मूचे स्पोर्ट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष बिलाल परिहर होते. श्रुतिका समीर कांबळे ही सध्या विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानगरी इ. १०वीमध्ये शिकत असून, सायोकान मार्शल आर्ट नॅशनल रेफ्री (पंच) डिप्लोमा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी आहे. यापूर्वी पण तिने सवाते फ्रेंच किक बॉक्सिंगमध्ये इंटरनॅशनल व नॅशनल गोल्ड मेडल मिळविले असून, कुस्ती,जुदो,कुराश, साम्बो,बॉक्सिंग या खेळामध्ये गोल्ड मेडल मिळून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यासाठी तिला विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्ता सुनेत्रा पवार व प्रिंसिपल मिस जॉयसी जोसेफ 'याचे मार्गदर्शन लाभले कांबळे हिची राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड झाल्याबद्दल पवार यांनी अभिनंदन केले या यशाबदल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फोटो ओळी : सायोकान मार्शल आर्टमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींना रेफ्री (पंच) निवडीचे पत्र देण्यात आले.
२००७२०२१-बारामती-०१