रुपीच्या कर्मचा:यांचे व्हीआरएससाठी अजर्

By Admin | Updated: September 6, 2014 00:26 IST2014-09-06T00:26:50+5:302014-09-06T00:26:50+5:30

आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुपी बँकेतील कर्मचा:यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे.

Application Form for VRS: | रुपीच्या कर्मचा:यांचे व्हीआरएससाठी अजर्

रुपीच्या कर्मचा:यांचे व्हीआरएससाठी अजर्

पुणो : आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुपी बँकेतील कर्मचा:यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. त्यासाठी बँकेतील 875 कर्मचा:यांपैकी 25क् ते 275 कर्मचा:यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली असून, त्यात बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक यांनीदेखील व्हीआरएस घेण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते. 
आर्थिक अनियमिततेमुळे रिझव्र्ह बँकेने दीड वर्षापूर्वी रुपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, त्यावर आर्थिक र्निबध घातले आहेत. सक्षम बँकेत रुपीचे विलीनीकरण करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या दीड वर्षापासून रुपी बँकेचा आर्थिक व्यवहार ठप्प आहे. मात्र, कर्मचा:यांचे वेतन, ठेवींवरील व्याज व इतर प्रशासकीय खर्च सुरू असल्याने बँकेच्या तोटय़ात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बँकेच्या कर्मचा:यांच्या वेतनावर दररोज सुमारे दहा लाख रुपये, तर ठेवीदारांचे व्याज व इतर खर्चापोटी दहा ते पंधरा लाख रुपयांचा खर्च होता.
बँकेचा तोटा कमी करण्यासाठी बँकेच्या थकीत कर्जाची वसुली होणो गरजेचे आहे. मात्र, कजर्वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) लागू करण्यास व व्हीआरएस योजनेस परवानगी द्यावी, अशी मागणी बँकेच्या प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आली होती.  रुपी बँकेत सुमारे 875 कर्मचारी आहेत. यातील काही कर्मचा:यांनी या पूर्वीच नोकरीवरील आपला हक्क कायम ठेवून (लीन) दीर्घकालीन रजा घेतली आहे. तर व्हीआरएस लागू झाल्यानंतर 25क् ते 275 कर्मचारी व अधिका:यांनी त्यासाठी अर्ज केल्याची माहिती 
सूत्रंनी दिली. या योजनेसाठी अर्ज करण्याचा गुरुवारी (दि. 4) शेवटचा दिवस होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: Application Form for VRS:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.